DIGITAL GRAMPANCHAYAT

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी ‘डिजिटल ग्राम’ ही संकल्पना अतिशय उपयुक्त आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना ग्रामपंचायतींची माहिती, विविध योजना यांची माहितीसमाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी व महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट व्हीलेज प्रकल्पा अंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी डिजिटल ग्रामपंचायतहा प्रोजेक्ट उपयुक्त आहे.

Digital Grampanchayat अंतर्गत आपल्या ग्रामपंचायती मध्ये खालील सेवा ग्रामपंचायत व ग्रामस्थांना मिळणार आहेत

  • ग्रामपंचायत मोबाईल अॅप
  • गावची दवंडी मोबाईल वर
  • एस एम एस,ई- मेल
  • सर्व करभरणा ऑनलाईन (घरपट्टी,पाणीपट्टी,दिवाबत्ती)
  • गावाच्या विकास कामांची माहिती
  • शासकीय योजनांची माहिती
  • वस्तू खरेदी आणि विक्री करण्याची सुविधा
  • नोकरीच्या बातम्या
  • सर्व राज्यस्तरीय व केंद्र स्तरीय योजनांची माहिती
  • शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य संस्थांची माहिती
  • शासकीय कार्यक्रमाची माहिती
  • रोजगाराच्या नवनवीन संधीची माहिती
  • ऊर्जा, कृषी, शिक्षण व आरोग्य विषयी योग्य माहिती
  • वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा विकण्याची सोय
  • गावातील उद्योगांची माहिती

इंडिया डिजिटल होत आहे,तुमचं गाव डिजिटल करा!

ग्रामपंचायत app च्या माध्यमातून ग्रामस्थाना घरबसल्या ग्रामपंचायत तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आणि सुविधा यांची माहिती मिळणार आहे.

या app मधून ग्रामस्थाना मिळणाऱ्या सुविधा खालीलप्रमाणे

  • गावाविषयी : यामध्ये लोकांना गावचा इतिहास तसेच गावाविषयी मूळ माहिती मिळेल.
  • पदाधिकारी : या मेनू मधून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच कर्मचारी यांची पूर्ण माहिती ग्रामस्थांना एका click वर मिळेल
  • सेवा व योजना: यामध्ये ग्रामपंचायत तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना मिळणार असून, शासन निर्णयांची माहिती पण यामधून मिळेल.
  • बाजारभाव : शेतकर्यांना यामधून दररोज बाजार समितीचे updated बाजारभाव मिळतील
  • ई दवंडी : ग्रामस्थांना वेगवेगळ्या योजनांची तसेच ग्रामसभेच्या नोटीस व इतर माहिती लोकांना ग्रामपंचायततर्फे देण्यासाठी हा मेनू महत्वाचा आहे.
  • बातम्या : जगभरातील सर्व महत्वपूर्ण घडामोडी घरबसल्या लोकांना या app मधून मिळणार असून, वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या बातम्या यामधून लोकांना मिळतील.
  • विकासकामे : गावामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून होणार्या विकासकामांची माहिती यामधून लोकांना मिळेल.
  • मार्केट : ग्रामस्थ या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू व उत्पादने विकण्यासाठी online जाहिरात करू शकतात. (उदा. mobile, गाय, म्हैस )
  • आरोग्य : गावातील आरोग्य विषयक सुविधांची माहिती लोकांना या मेनू मधून मिळेल
  • शाळा : गावातील शाळा आणि शैक्षणिक विषयी सुविधांची माहिती लोकांना या मेनू मधून मिळेल
  • नोकरी विषयक : रोजगाराच्या विविध संधींची माहिती गावातील सुशिक्षित युवकांना या माध्यमातून मिळेल.
  • महत्वाचे संपर्क : गावातील सर्व महत्वाचे संपर्क क्रमांक या माध्यमातून लोकांना घरबसल्या app मधून मिळतील.
  • उद्योग : गावातील विविध उद्योग धंदे लोक या app मध्ये नोंद करतील, त्यामुळे वेगवेगळ्या उद्योगांची माहिती लोकांना एका click वर मिळेल.
  • विकासपिडिया: ऊर्जा, शिक्षण, कृषी विषयक धोरणांची महत्वाची माहिती लोकांना या मेनू मधून मिळेल.
Chat with Us!