ग्रामपंचायत मोडगाव
मोडगाव हे डहाणू तालुक्यातील एक महत्त्वाचे व निसर्गरम्य गाव आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात सुमारे ६०० कुटुंबे राहतात. एकूण ३०२९ लोकसंख्येपैकी १५१७ पुरुष तर १५१२ महिला आहेत. यामध्ये ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या लक्षणीय असून गावाच्या एकूण लोकसंख्येत त्यांचा चांगला वाटा आहे. अनुसूचित जमाती (ST) समाजाची लोकसंख्या गावात मोठ्या प्रमाणावर असून काही प्रमाणात अनुसूचित जाती (SC) समाजाचे लोकही येथे वास्तव्यास आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, तसेच इतर कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन तसेच जंगलातील उपलब्ध संसाधनांवर आधारित उपजीविका करतात.गावातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असून भातशेती, तसेच काही ठिकाणी फळबागा (चिकू, आंबा) आढळतात. पावसाळ्यात हंगामी रोजगाराच्या स्वरूपात अळंबी (रानभाजी) गोळा करणे, लाकूड व इतर वनउत्पादन गोळा करणे असे उपक्रम चालतात. मोदगावमध्ये धार्मिक व पारंपरिक सणांना विशेष महत्त्व असून गणेशोत्सव, होळी, दिवाळी तसेच आदिवासींचे पारंपरिक नृत्य व सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गावातील ग्रामदैवताच्या यात्रेला विशेष महत्त्व असून त्या वेळी भजन, कीर्तन, लोकनृत्य यांचे आयोजन केले जाते. अशा प्रकारे मोदगाव हे पारंपरिक संस्कृती, शेतीप्रधान जीवनशैली आणि आदिवासी परंपरांचा सुंदर संगम असलेले गाव आहे.

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री

श्रीम. सुमेत्रा अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र शिंदे
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

श्रीम. पल्लवी हिंदुराव सस्ते
गट विकास अधिकारी
पंचायत समिती डहाणू
श्रीम. रंजना शिवराम चौधरी
सरपंच
ग्रामपंचायत मोडगाव
श्री. लुईस रुपजी कोंढरी
उपसरपंच
ग्रामपंचायत मोडगाव
श्री. चंदू धाकट्या डोंगरकर
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत मोडगाव
चालू योजना







