Digital Grampanchayat
Digital Grampanchayat प्रकल्प ग्रामपंचायतींच्या डिजिटल रूपांतरणासाठी तयार केला आहे. या पेजवर तुम्हाला प्रकल्पाची मुख्य सेवा आणि उद्दिष्टे स्पष्टपणे सापडतील.
Digital Grampanchayat Project
डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी 'डिजिटल ग्राम' ही संकल्पना अतिशय उपयुक्त आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना ग्रामपंचायतींची माहिती आणि विविध योजनांची माहिती समाजातील प्रगत घटकाबरोबरच दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रोजेक्ट उपयुक्त आहे.
मुख्य उद्दिष्टे
Digital Grampanchayat अंतर्गत आपल्या ग्रामपंचायतीमध्ये खालील सेवा ग्रामपंचायत व ग्रामस्थांना मिळणार आहेत.
- ग्रामपंचायत मोबाईल ऐप
- गावची दवंडी मोबाईल वर
- सर्व करभरणा ऑनलाईन (घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती)
- गावाच्या विकास कामांची माहिती
- शासकीय योजनांची माहिती
- वस्तू खरेदी आणि विक्री करण्याची सुविधा
- नोकरीच्या बातम्या
- सर्व राज्यस्तरीय व केंद्र स्तरीय योजनांची माहिती
- शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य संस्थांची माहिती
- शासकीय कार्यक्रमाची माहिती
- रोजगाराच्या नव्या संधींची माहिती
- ऊर्जा, कृषी, शिक्षण व आरोग्य विषयी योग्य माहिती
- वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा विकण्याची सोय
- गावातील उद्योगांची माहिती
- इंडिया डिजिटल होत आहे, तुमचं गाव डिजिटल करा